Showing posts with label Information (माहिती). Show all posts
Showing posts with label Information (माहिती). Show all posts

Monday, 26 June 2017

राजर्षी शाहू महाराज जयंती (माहिती)



राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. महाराजानी 28 वर्षे राज्यकारभार केला. शाहू महाराजांनीच लोकशाहीचा पाया घातला. तसेच त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. शाहू महाराजांनीच  अस्पृश्यता नष्ट केल्याचे महात्मा गांधीजींनी म्हटले आहे. 26 जून 1874 साली त्यांचा जन्म झाला असून आज शाहू महाराजांची जयंती आहे.

रमजान ईद माहिती


रमजान ईदचा उत्साह येताच सर्वप्रथम चर्चा होते चंद्रावर. ईद का चाँद, रमजान महिन्यातील 30 व्या रोजानंतरच दिसून येतो. हिजरी कॅलेंडर म्हणजेच इस्लामी कॅलेंडरनुसार ईद वर्षातून दोनदा येते. एक ईद ईद-उल-फितर आणि दुसरी ईद ईद-उल-जुहा नावाने साजरी होते. हिजरी कँलेडरनुसार चंद्र पाहून नवीन महिना सुरू होतो. तर जगभरातील सर्वच देशात एकाचवेळी ईदची सुरू व्हावी. यासाठी चंद्रदर्शन नंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते.