
... येथील कॉलेजात आर्ची घेणार 11 वी प्रवेश sairat
दहावीच्या परीक्षेत 66.40 टक्के मिळवल्यानंतर आर्ची उर्फ रिंकू राजगुरू कुठे प्रवेश घेणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, मी महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात घेणार असल्याचे रिंकुने पुण्यातील एका कार्यक्रमात जाहीर केले. मात्र, कोणत्या महाविद्यालयात रिंकूचा प्रवेश असेल याचा खुलासा तिने केला नाही. रिंकू नववीत असताना तिने सैराट चित्रपटासाठी चित्रीकरण केले होते. त्यानंतर ती महाराष्ट्रात घराघरात पोहोचली.